१ जानेवारी २०१४ ला मला एक साक्षात्कार झाला
अचानकच वाटलं , अरे कविता करायलाही जमतंय की मला
अर्थातच त्याची सुरुवात तुझ्यापासून केली
नूतन वर्षाच्या शुभेच्छांची बरसात कवितेतून झाली
परदेशीच्या वाऱ्या, IT चं English vinglish कल्चर
इंग्रजीत लिहायची मजा वाटते न्यारी
पण तरीही प्रेमाच्या नाजूक भावना व्यक्त करायला
आपली मराठीच आहे "लय भारी"
१७ फेब्रुवारी चा दिवस आठवला की सुंदर आठवणींच्या मनात उसळतात लाटा
हा दिवस माझ्यासाठी घेऊन आला असंख्य सोनेरी क्षणांचा साठा
"लग्न" "नवरा" या संकल्पनांची मला धास्ती होती थोडी
कसा असेल तो ? मला समजून घेईल का? एक ना दोन नाना प्रश्नांची मनात गाठोडी
पण सूर जुळले, ताल धरला आणि लय सापडली
आयुष्य इतका सुंदर हि असू शकता याची जणू प्रचीतीच आली
तू म्हणायचास non veg नको, मी म्हणायचे मिशी नको
आता हसू येत न आठवून,
नवरा माझा साधा भोळा म्हणून कि काय खाष्ठ ह्याची बायको
असा म्हणतात, लग्नाच्या जोड्या आधीच जुळलेल्या असतात
खरं असेल का ?
तसं होतं तर मग आधीच का नाही भेटलास,
इवलाश्या सोलापूरात कुठे लपून बसला होतास
तुझी सोबत असली कि सगळच वाटतं सहज सोप्पं किती
छोट्या छोट्या संकटांची मग बिलकुल वाटत नाही भिती
आजच्या दिवशी मी तुला देते एक वचन
सात जन्मांची साथ आपुली
मी कधीच हात सोडणार नाही
मग भले येवो मरण , मग भले येवो मरण …

No comments:
Post a Comment